कैदी पळाला आणि गटारात पडला ! पोलिसांबरोबरच्या झटापट

पोलिसनामा ऑनलाईन – कैद्यावर उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना तो पळून जाण्याची घटना मध्य प्रदेशात घडली. रायसेन येथील तुरुंगातून एक कैदी नाल्यात उडी मारून पळून जात होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक करण्यात आली. मचल सिंह असे त्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

उपचारासाठी या कैद्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात कैद्याचा एक्स-रे करण्यासाठी त्याच्या बेड्या पोलिसांनी काढल्या. त्यानंतर लगेचच मचलने पळून जाण्याचा प्रयत्न केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हा कैदी पळून जाताना दिसत आहे. नाल्यात उडी मारून कैदी पळत असताना, पोलिसांनी त्याला पकडले आहे. जेल कर्मचारी आणि पोलीस कैदामागे धावत गेले. अखेर पोलिसांनी या कैद्याला पुन्हा अटक केली. आरोपी मचल सिंह याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या कैद्याला अटक करून तुरुंगात डामले आहे. हा सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी पोलिसांवर टीका केली आहे. तर, काहींनी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.