महाड इमारत दुर्घटना : तब्बल 12 तासांनंतर पहिला मृतदेह काढला बाहेर

पोलिसनामा ऑनलाईन टीम रायगड जिल्ह्यातीव महाड इथे तारिक गार्डन पाचमजली इमारत काल संध्याकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडली. तब्बल 12 तासांपासून पोलीस, एनडीआरएफच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी तर ढिगार्‍याखाली अनेक जण अडकले आहेत. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ढिगार्‍यात पहिला मृतदेह सापडला आहे.

बचाव पथकाने जेसीबीच्या मदतीने 8 जणांना ढिगार्‍याखालून काढले आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल कऱण्यात आले असून तर ढिगार्‍याखाली अजूनही काही लोक अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीचा पहिला पिलर खचला तेंव्हा बहुतांश तरुण इमारतीच्या बाहेर पडले अशीही माहिती मिळाली आहे. इमारतीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार भारत गोगावले घटनास्थळी उपस्थित आहेत. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई तात्काळ देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.