मजबूत सरकार साठी महायुतीला बहुमत द्या : चंद्रकांत पाटलांचे आवाहन

कोथरूड आणि पुण्याचा विकासाकरिता कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात देखील मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीला विजयी करा. त्याचप्रमाणे विकास हाच माझा अजेंडा असून कोथरूड आणि पुणे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. २१ ऑक्टोबर रोजी आपले मतदानाचे कर्तव्य बजावा आणि भाजपाला, विकासाला मतदान करुन एका ऐतिहासिक विजयाचे भागीदार व्हा, असे आवाहन शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोथरूड विधानसभा मतदार संघातील चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराचा समारोप आज झंजावाती भव्य रॅलीने झाला. त्यावेळी ते बोलत होते. समाजातील सर्व घटकांनी प्रचारादरम्यान मला उस्फूर्तपणे पाठिंबा दिला. आतला आणि बाहेरचा या मुद्द्याचा विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी सर्वसामान्य जनतेला मात्र भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख धोरणावर पूर्ण विश्वास आहे. त्याचीच प्रचिती या प्रचारादरम्यान आली. राज्य सरकारच्या धोरणांच्या माध्यमातून कोथरूडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरीने प्रयत्न करीन, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Chandrakant Patil
काँग्रेस-राष्ट्रवादीने पराभव मान्य केलाय
ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवली आहेत तिथे मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी केली आहे. आमची त्याला काहीच हरकत नाही. मात्र, याचा अर्थ स्पष्ट आहे, काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधकांनी आपला पराभव मान्य केला आहे. आणि आता ते मतदानापूर्वी पराभवाची कारणे शोधू लागले आहेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली.

कोथरूड झाले भाजपमय
तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रचार सांगता दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. पावसाची रिमझिम सुरू असतानाही कोथरूडकर मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. या रॅलीदरम्यान संपूर्ण कोथरूड भाजपमय झाले. समारोपाच्या दिवशी माननीय चंद्रकांत पाटील यांनी झंझावाती प्रचार केला.

सकाळी केळेवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच, डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान व ताथवडे गार्डनला भेट दिली आणि येथे आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. वृत्तपत्र विक्रेता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
Chandrakant Patil
‘ही’ कोथरूडची संस्कृती नाही
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली. कोथरूडचा विकास हेच माझे पहिले आणि अंतिम ध्येय आहे. त्यामुळेच विरोधकांची कमरेखालील टीकादेखील मी सहन केली. त्याला प्रत्युत्तर दिले नाही. कोथरूडकरांची आणि पुण्याची संस्कृती मी जाणतो! विरोधकांनी कोणत्याही थराला जाऊन टीका करावी. कोथरूड आणि पुण्याच्या विकासासाठी ची कटिबद्धता हेच माझे या टीकेला उत्तर असेल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या