हास्यकल्लोळ ! चंद्रकांत पाटलांनी ‘इशारा’ करताच अजित पवारांनी केला ‘नमस्कार’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरवणी मागण्यांवर सहकाराविषयी बोलत असताना भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना इशारे करुन तुम्ही इकडे येता का ? असा प्रश्न केला. त्यावर अजित पवार यांनी नमस्कार करून उत्तर दिले. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सत्तास्थापनेची बोलणी सुरु केली असतानाच अजित पवार यांनी सर्वांना धक्का दिला. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, नंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने भाजपचे सरकार कोसळले.

अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमिवर चंद्रकांत पाटील यांनी इशारा केला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे बघून इशारा करताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी असे कोणतेही इशारे करु नका. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा काही वेळ सभागृहात हशा पिकला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/