Maharashtra Cabinet Expansion | राज्यात मंत्रिमंडळ विस्तार?, ‘या’ दोन नेत्यांच्या नावाची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार (Union Cabinet Expansion) झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. या पदावर नियुक्ती होऊन मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Maharashtra Cabinet Expansion) दोन नेत्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

संजय राठोड कमबॅक करणार ?
पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होईल असे संकेत दिले होते. त्यामुळे संजय राठोड पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

 

या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. या पदावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदावर शिवसेना दावा करणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हे पद काँग्रेसकडे असून काँग्रेसचा अध्यक्ष होईल असे स्पष्ट केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे.

प्रणिती शिंदेंना राज्यमंत्री पद ?
दरम्यान, काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापूरमध्ये म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी पक्ष वाढीसाठी खूपकाही केले आहे. तसेच प्रणिती शिंदे या सातत्याने निवडून येत आहेत. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांनी मंत्रीपद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

Web Title :- maharashtra cabinet expansion news after union cabinet reshuffle this two leaders names is doing the rounds

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य