राज्यात मराठा आरक्षण पेटणार, विविध मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने येत्या 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि आता संघटनेचा बंदचा इशार्‍याने सरकारला कोंडीत पकडले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. या निकालाचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात काल विविध संघटनांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. परिषदेला राज्यातील अनेक मराठा संघटनांचे नेते आणि प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यावेळी 15 ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याबरोबरच केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला देण्यासाठी अध्यादेश काढावा. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणार्‍या मेगा नोकर भरतीला स्थगिती देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार यासंदर्भात काय निर्णय घेउन मराठा संघटनांची समजूत काढणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like