3 वेळा फोन केला ‘मुख्यमंत्री’ फडणवीसांनी, पण ‘प्रतिसाद’ देत नाहीत उद्धव ठाकरे, ‘गुरुजी’ करतायत ‘मध्यस्थी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेवर काही तोडगा निघायला तयार नाही उद्धव ठाकरे हे सम समान वाट्यासाठी अडून बसलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना समजवण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर आता हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संभाजी भिडे यांनी देखील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडवीस यांचा फोनही उचलत नसल्याची माहिती समोर आली आहे.

मोतोश्रीवर पोहचले संभाजी भिडे
शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीला भेट दिल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे. एकीकडे सत्तेचा तिढा संपत नसताना भिडे गुरुजी यांनी मातोश्रीला भेट देणे यामागे नक्कीच काही मोठे नियोजन असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. भिडे गुरुजी ज्यावेळी मातोश्रीवर पोहचले त्यावेळी उद्धव ठाकरे मात्र तेथे उपस्थित नव्हते त्यामुळे शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी भिडे गुरुजींचे बोलणे झाले.

देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा केला उद्धव ठाकरेंना फोन
संभाजी भिडे यांच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना तब्बल तीन वेळा फोन केल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. उद्धव ठाकरे हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या फोनही उत्तर देत नसल्याने सत्तेची बोलणी पुढे कशी जाणार असा भाजप नेत्यांना प्रश्न पडला आहे.

कधी दुसऱ्या कॉल वर व्यस्त तर कधी आराम
पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला असता त्यांना उद्धव ठाकरे दुसऱ्या फोनवर व्यस्त असल्याचे सांगितले गेले. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा फोन केला असता उद्धव ठाकरे सध्या आराम करत असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. सत्ता स्थापनेचा तिढा सुटावा म्हणून फडणवीस यांना तिसऱ्यांदा फोन केला असता उद्धव ठाकरे तुम्हाला स्वतः कॉल करतील असे सांगण्यात आले. एका आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी तब्बल तीन वेळा उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे समजते.

कॉमन बिझनेस फ्रेंड कडूनही प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे कॉमन फ्रेंड असलेल्या एका व्यक्तीने उद्धव ठाकरे यांना संपर्क देखील केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून त्या व्यावसायिक मित्राला राजकारणावर कोणतीही चर्चा नको असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

शिवसेनेच्या उत्तराकडे लक्ष
भाजप मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही तर शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी अडून बसली आहे. अशात भाजपने सगळे प्रयत्न करून पहिले मात्र शिवसेनेने भाजपला अद्याप कोणतेच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे भाजप अजूनही शिवसेनेच्या प्रस्तवाची वाट पाहत आहे.

Visit : Policenama.com