शिवसेना ‘सेक्युलर’ झाली आहे का ? ‘कॅबिनेट’च्या बैठकीनंतर पहिल्यांदाच ‘भडकले’ मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर एक कॅबिनेटची बैठक घेण्यात आली यामध्ये झालेल्या निर्णयांबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली असल्यामुळे काल पत्रकारांनी आता शिवसेना सेक्युलर झाली का ? असा सवाल केला यावेळी उद्धव ठाकरे काहीसे चिडलेले पहायला मिळाले.

सेक्युलरचा अर्थ काय आहे ? असे उद्धव ठाकरे यांनी विचारले आणि संविधानात जे काही आहे ते सेक्युलर आहे असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावतीने उत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी देखील शिवाजी पार्कवर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी रायगड किल्ल्यासाठी वीस कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हे सरकार शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी आगामी काळात चांगले निर्णय घेईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या योजनांच्या माहितीचा अहवाल देखील सचिवांकडून मागून घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी गुरुवारी शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मंचावरून समस्त जनतेला अभिवादन करत जनतेसमोर नतमस्तक झाले.

Visit : Policenama.com