… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं नवं सरकार राज्यात सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेसोबतच्या संभाव्य सरकार स्थापनेविषयी माहिती दिली आहे.

शिवसेनेसोबतच्या संभाव्य सरकार स्थापनेवर भाष्य करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘.जर आम्हाला एकत्र येऊन 5 वर्षं स्थिर सरकार द्यायचं आहे, तर काही मुद्द्यावर स्पष्टता आवश्यक आहे. त्यावर आमची चर्चा सुरू आहे. आज आम्ही मुंबईतही जाणार आहोत. आपण सर्वजण राज्य घटनेला मानतो. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाला मानतो. त्यात वेगळा आग्रह असण्याचं कारण नाही. ‘

गेल्या जवळपास महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तेचा पेच अखेर सुटण्याची चिन्हं दिसत आहेत. सरकार स्थापनेसाठी सुरू असलेली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अंतिम टप्प्यात आली आहे. शरद पवार यांच्याकडे काल झालेल्या साडेतीन तास चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बैठक होणार आहे. मंत्रिपदांच्या वाटपावर स्पष्टता झालेली नाही. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल.

Visit : Policenama.com