Maharashtra Congress | काँग्रेसने आशिष देशमुखांना दाखवला पक्षाबाहेरचा रस्ता, हायकमांडकडून निलंबन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Congress | काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) आणि महारष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर टीका करणारे माजी आमदार आशिष देशमुख (Former MLA Ashish Deshmukh) यांना महागात पडले आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने (Congress Disciplinary Committee) देशमुख यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे. आशिष देशमुख मागील काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस (Maharashtra Congress) नेत्यांवर आरोप आणि टीका करत आहेत.

 

नुकतेत काँग्रेस नेते राहुल गांधी व नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच राहुल गांधी यांनी ओबीसी समुदायाची (OBC Community) माफी मागावी, असा सल्ला त्यांनी दिला होता. तर नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून दरमहा एक खोका (एक कोटी रुपये) घेतात, असा गंभीर आरोप केला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची नुकतीच बैठक झाली होती. (Maharashtra Congress)

 

या बैठकीत आशिष देशमुख यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेण्यात आली.
तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत तीन दिवसांत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित (Suspended) करीत स्पष्टीकरण सादर न केल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
खोटे आरोप करुन बदनाम करणे हा भाजपचा (BJP) अजेंडा आहे.
परंतु आपण सातत्याने काँग्रेस नेत्यांवर टीका करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे, असा शेरा समितीने दिला आहे.

 

Web Title :- Maharashtra Congress | former mla ashish deshmukh suspended from congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’, अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान