नितीन गडकरी सत्तास्थापनेत झाले ‘सक्रिय’, ‘तिढा’ सुटेल असं सांगत शिवसेनेला समजावला ‘हा’ फॉर्म्युला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटायला तयार नसताना हा गुंता सोडवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते सक्रीय झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. सक्रीय नेत्यांमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार विशेष लक्षवेधी मानला जात आहे. कारण त्यांचे संघाशी आणि मातोश्रीशी असलेले जवळचे संबंध. त्यामुळे दोन भावांमध्ये सुरु असलेल्या भांडणातून गडकरीच मार्ग काढू शकतात असा विश्वास भाजपला आहे.

नितीन गडकरीच भाजप-शिवसेनेमधील पूल बांधू शकतात अशी आशा आता निर्माण झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी आज कार्यक्रमात एकत्र भेटणार असल्याने राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगत आहेत. गडकरी राज्याच्या राजकारणात परतणार का, शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करणार का, अशा अनेक प्रश्नांवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, या शक्यता नितीन गडकरी यांनी फेटाळून लावल्या असून दोन्ही पक्षातील तिढा लवकरच सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचसोबत युती किंवा आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला कसा असतो तेही शिवसेनेला समजावलं.

ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला समजावून सांगताना म्हणाले की,  भाजपाचे 105 आमदार निवडून आले आहेत आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री होत असतो असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. थोडक्यात भाजप मुख्यमंत्रीपदावर तडजोड करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे त्यांनी सुचित केले आहे. शिवसेना चर्चा सुरु आहे आणि राज्यात हिताचा मार्ग लवकरच निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसच मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या राजकारणात येणार का यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येण्याची इच्छा नाही. भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनलं पाहिजे, असंही नितीन गडकरी यांनी ठामपणे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ युतीच्या वाटाघाटीमध्ये मध्यस्थी करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके