‘महाराष्ट्र सध्या जाती-पातीत सडतोय, महाराष्ट्राचा बिहार करायचा का ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशाचं नेतृत्व करणारा महाराष्ट्र सध्या जातीपातीमध्ये सडतोय. आपल्याला महाराष्ट्राचा बिहार करायचा का ? असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “कोणत्या ठिकाणी कोणत्या समाजाची लोक आहेत हे पाहून सध्या उमेदवार दिले जात आहेत. गेल्या 10-15 वर्षांपूर्वी राज्यात असे वातावरण नव्हते. देशाचं नेतृत्व करणारा महाराष्ट्र सध्या जातीपातीमध्ये सडतोय. आपल्याला महाराष्ट्राचा बिहार करायचा का ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मतदारसंघात उमेदवार निवडताना एकच निकष हवा तो म्हणजे उभा असलेला उमेदवार जनतेचं काम करणार की नाही. कोथरुडमधील निवडणूक तर अत्यंत सोपी आहे. तुम्हाला इथला आमदार स्थानिक हवा आहे की, बाहेरचा हा एवढाच निर्णय कोथरूडकरांनी घ्यायचा आहे.

राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्याच्या मद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, “राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला. पुतळा पाडणाऱ्यांना वाटलं राम गणेश गडकरी कोण आहेत हे माहिती नसेल. त्यांना वाटलं असेल की, नितीन गडकरींचे नातेवाईक असतील पाडा पुतळा. सध्या महापुरुष, साहित्यिक आणि कलाकार जातीपातींमध्ये वाटले जात आहेत.” असे ते म्हणाले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या