बंडखोरी व जागावाटप या कारणामुळे निकालावर परिणाम :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानुसार युतीला अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असे असले तरी भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही तसेच काही जागांवर धक्कादायक निकाल लागले आहेत. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मागील निवडणुकीत भाजपने २६० जागा लढवल्या होत्या. त्यात भाजपने  १२२ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी भाजप व मित्रपक्षांनी केवळ १६४ (१५०+१४) जागा लढवल्या त्यातही भाजप १०५ जागांच्या पुढे आहे. मागील निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ४७% होता तर यावेळेस स्ट्राईक रेट ७० % आहे. भाजपचा हा स्ट्राईक रेट आतापर्यंतचा  सर्वाधिक आहे.

आम्ही १६४ जागा लढवूनही आम्हाला २६ टक्के मतं मिळाली.  भाजपला जनतेने मोठे समर्थन दिले आहे. मात्र परळी आणि सातारा  हे दोन निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास होता की, पंकजा मुंडे परळीतून उदयनराजे साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत निवडून येतील परंतु दोघेही निवडून येऊ शकले नाहीतसेच भाजपचे काही मंत्रीही पराभूत झाले आहेत.

याचे निवडुकीनंतर विश्लेषण केले जाईल. बंडखोरी व जागावाटप या कारणामुळेही निकालावर परिणाम झाला आहे. विरोधी पक्षच्या जागा वाढल्या असल्या तरी त्यांचा फारसा प्रभाव पडलेला नाही. पुन्हा सरकार महायुतीचे होणार कुणाच्या मनात शंका नाही.’

निवडुकीत जनतेने कौल दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील  जनतेचे आभार मानले. तसेच  त्यांनी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला.