नितेश राणेंचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना ‘सवाल’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले. आज ते आपला कार्यभार स्वीकारतील. त्यांच्या रुपाने राज्याला 29 वे मुख्यमंत्री मिळाले. त्यानंतर आता नव्या मुख्यमंत्र्यांचा सामना आहे तो प्रबळ विरोधी पक्षांबरोबर. काल नवं सरकार स्थापन होतं ना होतं. विरोधी पक्षांकडून नव्या सरकारवर हल्लाबोल करण्यात सुरुवात झाली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर नितेश राणे यांनी टीका केली. नितेश राणेंनी ट्विट करत निशाणा साधला की महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचा उल्लेख आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मते स्थानिक म्हणजे मराठी माणूस (भूमिपुत्र) असा होतो किंवा उद्धव ठाकरेंनी स्थानिकांची नवी व्याख्या शोधून काढली आहे?

दोन दिवसांपूर्वी राणेंनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले, मला अभिमान आहे की ज्या पक्षाकडून मी आमदारकीची शपथ घेतलेली आहे. त्या पक्षाने सत्तेसाठी लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हते, तेव्हा आमचे नेते फडणवीसांनी सांगितले की, सत्ता स्थापन करु शकत नाही. त्याच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग घेतली नाही. लोकांचे तळवे चाटले नाहीत म्हणून मला अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे असे म्हणत त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.

विधिमंडळ आणि मुख्यमंत्रीची खुर्ची थोडी वेगळी आहे. बंगल्यात बसून आदेश देणे सोपे असते. विधिमंडळात प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात आणि ती अधिकृत द्यावी लागतात. सभागृहात काय होणार आहे लवकरच कळेल. पहिल्या दिवसापासूनच आमचा गोळा बारुद तयार आहे. आता फक्त मैदानात या असे आव्हानच नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले आहे.

Visit : Policenama.com