उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी ‘या’ तारखेनंतर निर्णय घेणार, प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख व नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रात संयुक्त सरकार स्थापण्याची आव्हाने अजून संपलेली नाहीत. कारण कॉंग्रेसने जरी सभापतीपदाची सूत्रे स्वीकारण्याचे मान्य केले असले, तरी अद्याप उपमुख्यमंत्र्यांबाबत निर्णय झालेला नाही. तर विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर 22 डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून गोंधळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांना ही जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. तसेच जयंत पाटील हेही या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहेत. राष्ट्रवादीत यावर मतभेद आहेत. मात्र राष्ट्रवादीने याबाबत आत्तापर्यंत अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याशिवाय उपमुख्यमंत्रीपदाची कॉंग्रेसकडून मागणी केली जात आहे. त्यांची मागणी विचारात घेतल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. कॉंग्रेसने सभापतीपदासाठी सहमती दर्शविली म्हणजेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यास सहमती दर्शविली. दरम्यान, नाना पटोले यांना कॉंग्रेसकडून सभापती म्हणून उमेदवारी दिल्यानंतर भाजपने आपला उमेदवार म्हणून किसन कठोरे यांचे नाव निश्चित केले आहे.

Visit : Policenama.com