शिवसेनेचा भाजपवर ‘शायरी’मधून ‘हल्ला’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नसून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत असून लवकरच यावर निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी यारों नए मौसम ने ये एहसान किया है, याद मुझे दर्द पुराने नहीं आते असे ट्विट करत भाजपवर वार केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर सरकार स्थापनेच्या शिवसेनेच्या हालचाली सुरु असताना या ट्विटला महत्व प्राप्त झाले आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरु केले असून याआधी देखील संजय राऊतयांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करू नये आम्ही लढाईसाठी नेमही तयार असतो असे राऊत यांनी याआधी देखील म्हटले होते. राऊत यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

तसेच निवडणुकीआधी ठरलेल्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून देखील दोन्ही पक्षांमध्ये मोठी धुसफूस पाहायला मिळाली होती. शिवसेनेच्या वतीने 50:50 टक्के सत्तावाटपाची मागणी करण्यात येत होती तर भाजप हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हणत होते. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष असून कधी सरकार स्थापन होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.

Visit : Policenama.com