… तर पुन्हा एकदा शिवसेना भाजपा युती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाने 50-50 टक्के सत्तावाटपाचा फॉर्म्युला मान्य केल्यास शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करण्याचा विचार करू शकते, अशी माहिती शिवसेनेमधील सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल येऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे, मात्र अद्यापही सत्ता स्थापन झाली नाही.

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तास्थापनेची चर्चा थांबली होती. त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली.

त्यांनतर सत्तास्थापनेविषयी शरद पवार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे. यातूनच शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवसेनेनं आता राष्ट्रवादीसोबत चर्चा करणं थांबवून पुन्हा भाजपसोबत चर्चा करावी,’ असा मतप्रवाह शिवसेनेत तयार होत आहे.

भाजप घेणार राष्ट्रवादीची मदत ?

राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ मित्र किंवा शत्रू असत नाही असं म्हणतात. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या चालू असलेल्या घोळावरून सध्या असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपानं सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्लान बीदेखील तयार ठेवला आहे. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला साथ दिल्यास शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची तयारी भाजपाने केली आहे.

Visit :  Policenama.com