शरद पवारांना भेटण्यासाठी उध्दव ठाकरे ‘रवाना’, ठरणार सर्व ‘समीकरणं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यात असून राष्ट्रवादी काँग्रस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याची चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. राज्यापालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या गटामध्ये हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निकालानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे असून ते शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले आहे. या भेटीदरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादीला प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवेनेने आपल्या सर्व आमदारांना 4 वाजता हॉटेलमध्ये एकत्र बोलावले आहे. तर राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांची बैठक चार वाजता बोलावण्यात आली आहे.

भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच आता उद्धव ठाकरे पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेण्यासाठी जात आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दाखवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर प्रतिसाद देण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला आहे.

Visit : Policenama.com