भाजपच्या प्रचारसभेत ‘हा’ प्रश्न विचारल्याने तरूणाला पोलिसांकडून अटक

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यामुळे नेते मंडळीही प्रचार सभा घेत आहेत. या सभांमध्ये अनेक नागरिक प्रश्नही विचारतात. त्याची उत्तरे देणे या नेत्यांना बांधील असते. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अमरावतीच्या जरूड इथं ही सभा झाली. यावेळी एका तरूणाने आमदार अनिल बोंडे यांना विकासकामासंदर्भात काही प्रश्न विचारले, त्याने सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. मतदारसंघाचा कोणता विकास केला ते सांगा? असा प्रश्न भाजपच्या प्रचारसभेत विद्यमान खासदार रामदास तडस आणि भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांना विचारला. त्यावर सभेत गोंधळ झाला. मात्र या नेत्यांनी आपले भाषण काही थांबवले नाही.

ज्या तरूणाने आपल्या आमदार खासदारांना आपल्याच विभागातील विकासाबाबत प्रश्न विचारले, त्याला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरामुळे प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, भर सभेत नेत्यांना विकासकामांबद्दल लोकांकडून प्रश्न या पुर्वीही विचारण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच बीडमधील भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनी गावातील लोकांना भेट दिली होती. त्यावर गावकऱ्यांनी त्यांना गेल्या पाच वर्षात काय केलं, असे काहीसे प्रश्न केले होते.

Loading...
You might also like