Maharashtra Monsoon Update | कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’; हवामानाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (गुरूवार) राज्यात मुसळधार पावसाची (Maharashtra Monsoon Update) शक्यता आहे. कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यभर मान्सून (Maharashtra Monsoon Update) सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईतही (Mumbai) मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काही भागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

दरम्यान, मुंबई, ठाण्यात (Thane) सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे गुन्हे शाखेचे आणि वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाणी शिरले आहे. सेक्शन पंपाद्वारे पाणी उपसण्याचे काम सुरु आहे. पोलीस मैदानात देखील तलावाचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon) पडत आहे. सध्याच्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. डोंगराळ भागात पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागात उद्यापर्यंत म्हणजेच 30 जूनपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title : Maharashtra Monsoon Update | heavy rain in the maharashtra imd konkan mumbai rain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा