Maharashtra Municipal Election | मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, लातूरसह ‘या’ 20 महानगरपालिकांची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात? असा असू शकतो कार्यक्रम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Municipal Election | वाढीव वॉर्डांसह मुंबईतील प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा निश्चित करणे आणि बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जारी केला आहे. त्यानुसार 2 मार्चला अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे मार्च (March) आणि एप्रिलमधील (April) शाळा-कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल अखेरीस किंवा मे (May) महिन्यात राज्यातील 20 महापालिकांच्या निवडणुका (Maharashtra Municipal Election) एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.

 

मुंबई महापालिकेच्या (BMC) विद्यमान नगरसेवकांचा कालावधी 8 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निवडणूका (Maharashtra Municipal Election) होतील, अशी शक्यता होती. मात्र, प्रारुप आराखडा अंतिम करणे, बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमांकनाची प्रक्रियाच 2 मार्च पर्यंत चालणार आहे. हा टप्पा पार पडल्यानंतर राज्यातील महापालिकामधील आरक्षणाची सोडत (Reservation) जाहीर करणे आणि अचारसंहिता (Code of Conduct applies) लागू करणे असा कार्यक्रम असतो. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणूका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

 

असा असेल कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या निर्देशांकानुसार 1 फेब्रुवारीला प्रारुप अधिसूचना (Draft Notification) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती (Objection) आणि सूचना (Suggestions) मागविण्याचा कालावधी आहे. 26 फेब्रुवारीला या हरकती-सूचनांवर सुनावणी होईल. 2 मार्चला यासंदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. मुंबई-ठाणे आणि इतर महापालिकांसाठी असाच कार्यक्रम असणार आहे.

 

सुनावणीनंतर OBC आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आरक्षणाची मर्यादा 50 टक्के निश्चित करुन ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द करण्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारने (State Government) या मर्यादेत 27 टक्के आरक्षणाचा निर्णय दिला. परंतु, इम्पिरिकल डेटाशिवाय (Imperial Data) आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने हा निर्णय देखील फेटाळून लावला. त्यामुळे सुनावणी नंतर ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार?
विद्यमान नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी निवडणूक होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिकेतील प्रशासकांची (Administrator) नेमणूक केली जाणार की नगरसेवकांना (Corporator) मुदतवाढ दिली जाणार,
याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे. सध्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,
वसई-विरार आणि पनवेल या महापालिकांमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्यातील महापालिका आणि कंसात कार्यकाळ
मुंबई (8 मार्च 2022), ठाणे (5 मे 2022), नवी मुंबई (8 मे 2022), कल्याण-डोंबिवली (10 नोव्हेंबर 2020), पुणे (14 मार्च 2022),
पिंपरी-चिंचवड (13 मार्च 2022), नाशिक (14 मार्च 2022), औरंगाबाद (28 एप्रिल 2022), नागपूर (4 मार्च 2022), पनवेल (9 जुलै 2022),
वसई-विरार (27 जून 2020), कोल्हापूर (15 नोव्हेंबर 2020), भिवंडी-निजामपूर (8 जून 2022), उल्हासनगर (4 एप्रिल 2022),
सोलापूर (7 मार्च 2022), परभणी (15 मे 2022), अमरावती (8 मार्च 2022), अकोला (8 मार्च 2022), चंद्रपूर (28 मे 2022),
लातूर (21 मे 2022). जर महापालिकांच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये झाल्या,
तर जून-जुलै महिन्यात मुदत संपणाऱ्या महापालिकांचा यामध्ये समावेश होणार का, याबाबत अद्याप संभ्रम आहे.

 

आयोगाकडून नव्याने सीमांकन
राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील वॉर्डांची संख्या वाढवणे आणि अन्य महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत कायदेशीर दुरुस्त्या (Legal Amendment) पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग नव्याने सीमांकन, प्रारुप आराखड्याचा कार्यक्रम निश्चित करणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Municipal Election | Elections for 20 Municipal Corporations including Mumbai, Thane, Pune, Pimpri, Nashik, Aurangabad, Nagpur, Solapur, Chandrapur, Latur in April-May? This can be an event

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन मागितली खंडणी; सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या मालकांविरूध्द गुन्हा

 

Gold Price Today | रू. 47,600 झाला 10 ग्रॅम सोन्याचा भाव, जाणून घ्या चांदीचा काय आहे दर

 

Naagin 6 : Tejasswi Prakash | पूर्ण जगाला धोकादायक षडयंत्रापासून वाचवण्यासाठी येतेय ‘नागिन 6’, कार्यक्रमाचा प्रोमो पाहून तेजस्वी प्रकाशचे चाहते झाले खुश