Maharashtra NCP Crisis | शरद पवारांनी निर्णय घेतला असता तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Politics News) झाला आहे. यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळत असताना राष्ट्रवादीच्या (Maharashtra NCP Crisis) 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत (BJP) जाऊन सत्ता स्थापन करण्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मानस व्यक्त केला होता. मात्र त्यांनी निर्णय घेतला नाही. याच संधीचा फायदा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला, असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला आहे.

 

प्रफुल्ल पटेल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक घडामोडींची माहिती दिली. 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार (Uddhav Thackeray Government) कोसळत असताना त्यावेळी पक्षात (Maharashtra NCP Crisis) काय सुरु होतं याचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. ठाकरे सरकार कोसळणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. आपण भाजपसोबत जायला हवं अशी आमदार आणि कर्यर्त्यांची इच्छा आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. अनेक आमदारांना निधी मिळत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत, अशा परिस्थितीत सरकारमध्ये सहभागी झाले तर आमदारांच्या समस्या सुटतील, असे पत्रात लिहिलं होतं, असा खळबळजनक दावा पटेल यांनी केला.

 

तर अजित पवार मुख्यमंत्री असते

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहटीत असताना राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच आमदारांनी शरद पवार यांना निर्णय घेण्याची विनंती केली होती. भाजपसोबत सत्तेत जायला हवं, अशी त्यांची भूमिका होती. मात्र पवारांनी निर्णय घेतला नाही आणि एकनाथ शिंदेंनी ही संधी साधली. ते मुख्यमंत्री झाले. पवारांनी निर्णय घेतला असता तर शिंदे नाही तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला.

 

खातेवाटपाबाबत चर्चा सुरु

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतल, असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. यावर बोलताना पक्ष शिवसेनेसोबत (Shivsena) जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. भाजपासोबत जाण्याचा आमदारांचा मनसुबा होता. त्यानंर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा सुरु केली. सध्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. येत्या काही दिवसांत आणखी आमदार शपथ घेतील.
अजित पवार आणि फडणवीस यांच्या खातेवाटपाबाबत चर्चा सुरु असून एक-दोन दिवसांत त्यासंदर्भात निर्णय होईल, असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

 

 

Web Title :  Maharashtra NCP Crisis | 51 ncp mlas wanted sharad pawar to explore possibility
of joining hands with bjp says praful patel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा