Maharashtra NCP Crisis | ‘मी पुस्तक लिहलं तर महाराष्ट्राला धक्का बसेल’, प्रफुल्ल पटेलांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Crisis | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) हे भाजप (BJP)-शिवसेनेने (Shiv Sena) स्थापन केलेल्या सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीतले अनेक आमदार, खासदार, नेते अजित पवारांबरोबर आहेत. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Maharashtra NCP Crisis) नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले सर्व नते त्यांच्यासोबत गेले आहेत. परंतु शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे देखील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. आज अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्र्यातील मुंबई एज्युकेशन ट्रस्ट येथे सुरु आहे. या बैठकीत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, 2022 ला महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता जेव्हा जात होती, तेव्हा शिंदे सुरत, गुवाहाटी, गोवा करत फिरत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार, विधान परिषद सदस्य शरद पवारांना भेटले होते. आपण भाजपसोबत सत्तेत जाऊ अशी विनंती करत होते. अजित पवारांनी पहाटे शपथविधी केला त्यांचे वारंवार बोलले जाते. अजित पवारांनी पक्षाच्या, कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घतेला आहे. (Maharashtra NCP Crisis)

तेव्हा महाराष्ट्रात धक्का बसेल

प्रफुल्ल या मंचावर कशासाठी, त्यांच्या मंचावर का नाही याचे उत्तर देशच नाही तर महाराष्ट्र शोधत आहे. प्रफुल्ल पटेल सौम्य बोलतो. कमी बोललेलेच चांगले असते. मी पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. जेव्हा हा प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहिल तेव्हा महाराष्ट्राला धक्का बसेल, काय काय समजेल हे मला सांगण्याची गरज नाही. प्रफुल्ल पटेल म्हणजे त्यांची सावली होती, नेहमी त्यांच्यासोबत असायचो. कधी विरोधात पाहिलेय का? अजूनही वेळ गेलेली नाही. मी जाहीरपणे हात जोडून पाय जोडून विनंती करतो आमची पण भावना समजून घ्या. तुमच्या आशिर्वादाने आम्ही सगळे याच दिशेने काम करु, असा इशारावजा आवाहन पटेल यांनी शरद पवार यांना केले आहे.

भाजपसोबत गेलो तर…

कोणी म्हणते वैचारिक मतभेद. ज्या दिवशी महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना कोणासोबत होती, भाजपसोबत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना सर्वाधिक शिव्या दिल्या असतील तर बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) दिल्या. मग भाजपसोबत गेलो तर काय वाईट. काश्मीरच्या महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti), फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) हे भाजपसोबत जाऊ शकतात. स्टॅलिन (Stalin) एनडीएचे (NDA) भागीदार होते. मी विरोधकांच्या त्या बैठकीमध्ये गेलो होते. ते चित्र जेव्हा मी पाहिले तेव्हा मला हसू येत होते. एका पक्षाचे खासदार शून्य होते. त्या 17 पक्षांसोबत जाऊन काय होणार आहे. आम्ही पक्षाच्या, मतदारसंघांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे, असे पटेल म्हणाले.

Web Title :  Maharashtra NCP Crisis | if i write a book there will be an uproar in maharashtra sharad pawars shadow big warning from praful patel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज