Maharashtra Political News | ‘भाजपत येण्यासाठी रांग लागली आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड लावलाय’, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्याने महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) अस्तित्वात आले. (Maharashtra Political News) या सरकारला 30 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह महत्वाचे आमदार सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड केल्याने शिवसेने प्रमाणेच राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले. त्यानंतर काँग्रेस (Congress) पक्ष फुटणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, भाजपचे (BJP) बडे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

आता नो रूम अवेलेबल

भाजपात येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत. परंतु आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता ‘नो रूम अवेलेबल’, ‘हाऊसफुल्ल’ असा बोर्ड लावला आहे, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. काँग्रेसमधील अनेक नत्यांशी आमचं बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावं की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही, असं थेट आव्हान मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेत्यांना दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे खरं आहे की…

राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) प्रश्न विचारला असता मुनगंटीवार म्हणाले,
हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा.
फिजिक्सच्या विषयाला केमिस्ट्रीचा पेपर कसा येईल? असंही ते म्हणाले.
एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात फक्त घोषणा केली.
मात्र महायुतीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.
हे खरं आहे काही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.
पण आमचं सरकार ही मदत लवकरात लवकर देईल, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Digambar Darade | लंडन, सिगांपूर, जर्मनीतही ऋषी सुनकचा डंका ! पत्रकार दिगंबर दराडेंचे पुस्तक सिंगापूरच्या ग्रंथालयात

Terrorist Arrest In Pune | अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांकडील तपासात महत्वाची माहिती आली समोर, देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट; आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Pune Traffic Updates | ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजी वाहतूकीत बदल

Ajit Pawar On Eknath Shinde | शिवसेना प्रमुख म्हणत अजित पवारांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले…

Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर