Maharashtra Politics News | फडणवीस साहेब… शरद पवारांच्या नादात आपल्या निष्ठावंतांची जिरणार नाही ना? पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याचं पत्र व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड पुकारत (Maharashtra NCP Crisis) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले, तर काही आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत (Maharashtra Politics News) असल्याचे सांगण्यात आले. राज्यात घडलेल्या या घडामोडीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, फडणवीस यांची गुगली भाजपच्या (BJP) निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी करणारी असल्याची चर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. याच दरम्यान पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha Pune) एका पदाधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही प्रश्न विचारले आहेत.

 

पुणे ग्रामीण भाजप (Pune Rural BJP) युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी (General Secretary Navnath Parkhi) यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पाच प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे पुणे जिल्ह्यात मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढे दिवस ज्यांच्याविरोधात काम केले आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे का? असा प्रश्न देखील नवनाथ पारखी यांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra Politics News)

नवनाथ पारखी यांनी उपस्थित केलेले 5 प्रश्न

1. अजित पवार व त्यांचे सहयोगी यांना सत्तेत सामावून घेवून राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढेल का भाजपची?
2. आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांचे वाली आपण आहात मग आम्हाला ताकद देणं हे काम आपले नाही का?
3. वेळ पडेल त्यावेळेस जेवणाची शिदोरी सोबत घेवून आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. मग आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं संघटनेत महत्त्व काय?
4. मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची तर जिरणार नाही ना?
5. भाजपचे मंत्री पदाच्या शर्य़तीतील सहयोगी आमदार नेत्यांचं काय? ज्यांनी आजवर पक्षासाठी खूप काही केलंय?

साहेब जमलं तर जरूर उत्तर द्या, अशी सादही त्यांनी घातली आहे.

Web Title :  Maharashtra Politics News | a bjp office bearer from pune district wrote a letter to devendra fadanvis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय