Maharashtra Politics News | पार्टटाईम गृहमंत्र्यांमुळे गुन्हेगार मोकटा अन् पोलीस सुस्त, काँग्रेसचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यातील मविआचे सरकार (MVA Government) कटकारस्थान करुन पाडले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होऊन एक वर्ष झाले. हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला दहा वर्ष अधोगतीकडे घेऊन जाणारे ठरल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी केली आहे. (Maharashtra Politics News) तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था (Law and Order) बिघडली असून राज्याचे गृहमंत्री हे पार्टटाईम असल्यामुळेच गुन्हेगार मोकाट अन् पोलीस (Maharashtra Police) सुस्त असल्याचे सांगत पटोले यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यात 20 ठिकाणी दंगली (Riot) घडवून आणल्या. ईडी सरकारच्या (ED Government) काळात महिला सुरक्षित नाहीत. मुंबई हे देशात महिलांसाठी सुरक्षित शहर असा नावलौकिक होता मात्र लोकलमध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांच्या हत्या वाढत आहेत, राज्यातील चार हजारांपेक्षा जास्त महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. (Maharashtra Politics News) पुण्यासारख्या शहरातही दिवसाढवळ्या मुलीवर कोयत्याने हल्ला (Assault On Girl In Sadashiv Peth Pune) होतो. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

नाना पटोले पुढे म्हणाले, सध्याच्या गृहमंत्र्यांकडे सहा ते सात विभागांचा कारभार, सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री व राजकीय साठमारीतून त्यांना गृहविभागाकडे लक्ष देता येत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार नाहीतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधकांना जाहीरपणे धमकी देत आहेत. ईडी सरकारच्या काळात गुन्हेगार मोकाट व पोलीस प्रशासन सुस्त आहे. केवळ विरोधी पक्षांवर कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

Web Title :   Maharashtra Politics News | due to the part time home minister criminals go free the police are lethargic and womens abuse has also increased nana patole on devendra fadanvis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा