Maharashtra Politics News | ‘अजित पवारांना मुख्यमंत्री करु’, ‘या’ नेत्याची अजित पवारांना थेट ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्याबाबतीत अनेक चर्चा सुरु आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार भाजपात (BJP) जाणार असल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे माझ्या पक्षात (Maharashtra Politics News) आले तर आनंदच आणि आम्हाला मुख्यमंत्रीपदाची (CM) संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले, अजित पवार भाजपात जातील असं वाटत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होणार नाही. कारण तेवढे आमदार नाहीत. पण राजकारणात (Maharashtra Politics News) काहीही होऊ शकते. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देऊ अशी ऑफऱ रामदास आठवलेंनी दिली.

म्हणूनच उद्धव ठाकरे तोंडावर पडले

रामदास आठवले म्हणाले, आदित्य ठाकरे, म्हणतात, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले,
म्हणूनच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तोंडावर पडले, रडण्याचा विषय नाही.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही.
तो खरा शिवसैनिक (Shiv Sainik) आहे. बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) अनुयायी आहे.
रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणं चुकीचं आहे.
एकतर भाजपला (BJP) सोडून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) त्यांनी आघाडी केली म्हणून शिंदेंनी बंड केले असं रामदास आठवले म्हणाले.

Web Title :-  Maharashtra Politics News | ‘Make Ajit Pawar Chief Minister’, leader’s direct offer to Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Pune Collector Dr. Rajesh Deshmukh Marathi | मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील 329 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन