Maharashtra Politics News | ‘महाविकास आघाडीत खेळखंडोबा होईल’, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र राहिल, असं वाटत नाही. कुठल्या तरी कारणामुळे भांडण होऊन खेळखंडोबा होईल, यातून जमले नाही म्हणून वेगळे गेलो सांगायचं, असं वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. ते वंचित बहुजन आघाडीच्या (Maharashtra Politics News) उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने कुर्ला येथे सत्ता परिवर्तन सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मविआवर निशाणा साधला.

 

आघाडीत बापात बाप नाही…

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, महाविकास आघाडीला आम्हाला बाहेर ठेवायचे आहे. ठिक आहे बाहेर ठेवा. फरक पडत नाही. पण, तुमच्यात तरी जागावाटप करा. लोकसभेच्या (Lok Sabha Elections) 48 जागांचं वाटप करण्यासाठी आधी चर्चा तरी करा. मात्र, महाविकास आघाडीत (Maharashtra Politics News) बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी परिस्थिती आहे. 16 आमदार अपात्र (16 MLA Disqualified) झाले तर 40 जण प्रवेश करायला तयार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

त्यांचं आमच्या पक्षाबद्दल वेगळं मत

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना नागपुरात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचे आमच्याबद्दल असणारी मते, आजची नाहीत. मागील निवडणुकीत काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि वंचित अशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यामध्ये आम्हाला यश आले आहे. त्यांचं आमच्या पक्षाबाबत वेगळं मत आहे, हे प्रकर्षाने जाणवलं आहे.

 

त्यांचा मविआशी संबंध नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही.
तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. त्यामुले प्रकाश आंबेडकर यांच्यावर काहीही बोलणार नाही. त्यांनी काय बोलावं, हा त्यांचा प्रश्न आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | prakash ambedkar slams mahavikas aghadi over loksabha election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा