Maharashtra Politics News | अजितदादांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय, शिवसेना नेत्याने व्यक्त केला संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्याच्या राजकारणात लवकरच आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार (NCP MLA) सत्ताधारी पक्षात जाणार असल्यचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये होत असलेल्या वादांवरुन हा संशय (Maharashtra Politics News) आणखी बळावला आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार असल्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या (Ajit Pawar) भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आहे. अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेकडून (Shivsena) प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी अजित पवारांच्या सुरु असलेल्या चर्चांवर सूचक विधान केलं आहे. (Maharashtra Politics News)

 

उदय सामंत म्हणाले, अजित पवार नाराज आहेत का नाही, माहिती नाही. पण काल त्यांनी फडतूस शब्दावर केलेलं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. अशाप्रकारची खालच्या पातळीची वक्तव्य कुणी करु नये, नाव जरी घेतलं नसलं तरी पत्रकार परिषद घेणाऱ्यांना हे समजलं पाहिजे, असा टोला उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख (Thackeray Group) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.

 

सामंत पुढे म्हणाले, अजित पवार नाराज आहेत का नाही, माहिती नाही.
पण त्यांच्या वक्तव्यावरुन अजितदादांच्या मनात काहीतरी वेगळं चाललं आहे, हे जाणवतं.
त्यात त्यांना मूळ खूर्चीच्या डाव्या बाजूला बसावं लागलं, ही शोकांतिका आहे, असा टोला सामंत यांनी अजित पवारांना लगावला.

 

तोच प्रयोग राष्ट्रवादीसोबत सुरु
दरम्यान, महाविकास आघाडीत असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली.
या बैठकीला संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या बैठकीला 48 तास होत नाहीत,
तोच संजय राऊतांनी (Sanjay Raut) गौप्यस्फोट केला.
शिंदे सोबत गेलेल्या आमदारांपैकी निम्म्या जणांवर ईडीच्या कारवाया सुरु होत्या,
आता तोच प्रयोग राष्ट्रवादीसोबत सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Politics News | Something else is going on in Ajitdad’s mind, the Shiv Sena leader expressed suspicion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिका नोकरभरती : दुसर्‍यांदा मुदतवाढ, आतापर्यंत 8774 अर्ज

Baramati NCP MP Supriya Sule | विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी; निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी

Pune ACB Trap | 10 हजाराची लाच घेणारा मावळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाच घेण्यासाठी आला अन् 9.50 लाख रुपयांसह 250 ग्रॅम सोनं गमावून बसला, लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले