Maharashtra Politics News | शिंदे गटाचे 8 ते 9 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटाचा दावा; शंभूराज देसाई म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीत बंड (NCP Rebellion) करुन अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देत शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झालेला नसल्याने अनेक आमदार नाराज आहेत. त्यातच राष्ट्रवादी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने सत्तेत आणखी वाटेकरी (Maharashtra Politics News) आले आहेत. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार (Shiv Sena Shinde Group) नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी शिंदे गटातील 8 ते 9 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांनी गेल्या दोन दिवसांत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधला आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

काय म्हणाले विनायक राऊत?

राज्यात गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण सुरु आहे. यामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी होत आहे. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला. यासाठी श्रीपाद डांगे (Shripad Dange), आचार्य अत्रे (Acharya Atre) यांसारख्या थोर नेत्यांचे योगदान लाभलं. त्या संयुक्त महाराष्ट्राला कुटुंब फुटीचा काळीमा लागला आहे. याकडे जनता तुश्चतेने पाहात आहे, याची देशभरात निर्भत्सना केली जातेय, असे विनायक राऊत म्हणाले. (Maharashtra Politics News)

या केवळ अफवा – शंभूराज देसाई

या चर्चांवर आता शिवसेना शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. शंभूराज देसाई म्हणाले, या केवळ अफवा आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदारांची बैठक बोलवली होती, तिथे या मोठ्या नेत्यांव्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. त्यामुळे आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे की जी चर्चा तिथे झालीच नाही, तिथे असं काही घडलंच नाही, त्या गोष्टी माध्यमांना कोण सांगतंय? मी माध्यमांना हात जोडून विनंती करतो की, तुम्ही आधी खात्री करा. आमच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना विचारा. कारण आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. तसेच मुख्यमंत्रीही नाराज नाहीत, अशे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title :  Maharashtra Politics News | uneasiness in the shinde group eight to ten mlas contact thackeray vinayak rauts big claim said mothers forgiveness

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा