Maharashtra Rain | राज्यात पावसाचा यलो अलर्ट, ‘या’ ठिकाणी जोरदार कोसळू शकतो पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Rain | हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची (Heavy Rain ) शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain)

जोरदार पावसाची शक्यता असल्याने मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पवसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे त्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी पावसाची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतातील उभी पिके वाचवण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. मात्र पाऊस नसल्याने पाण्याचे इतर स्त्रोत कोरडे पडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. (Maharashtra Rain)

यंदा पावसावर एल निनोचा मोठा परिणाम झाला आहे. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोमुळे भारतातील
हवामानावर परिणाम होत आहे. भारतातील अनेक भागांत पावसाने दडी मारली असून यामुळे आर्थिक फटका देखील
बसण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन