Maharashtra Rain Update | राज्यात धुवांधार पाऊस; पुण्याला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट, हवामानाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने  (Maharashtra Rain Update) जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नद्यांना पूर आले आहेत, तर काही ठिकाणी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. आज (शनिवार) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.

कोकणातील (Konkan) रत्नागिरी (Ratnagiri), पालघर (Palghar) तसेच विदर्भातील (Vidarbha) चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), यवतमाळ (Yavatmal) आणि गोंदिया (Gondia) या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुण्याच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 200 मिमी हून अधिक पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्याला रेड अलर्ट (Pune Red Alert) जारी केला आहे. (Maharashtra Rain Update)

मुंबईत (Mumbai) काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल, तसेच मुंबईला आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) वर्तवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगडमध्ये (Raigad) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे.
घाट माथ्यावर 100 मिमी हून अधिक पावसाचा अंदाज आहे.

रत्नागिरीत (Ratnagiri) काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज,
ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल. हवामान विभागान ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे.
तर सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याला यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
साताऱ्याला (Satara) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व