Maharashtra Rain Update | काही भागात पावसाची हजेरी; महाराष्ट्रात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | मुंबईसह (Mumbai) उपनगर ठाणे (Thane), कोकण (Konkan) विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांत चांगला पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पुण्यासह (Pune) काही जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. आज (शनिवार) आकाश ढगाळ झाल्याने पुण्यातही पावसाची शक्यता आहे. दरम्यान, काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आज महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला आहे.
या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच अकोला जिल्ह्यातही (Akola) चांगला पाऊस झाला.
मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. तर अनेक नदी नाल्यांना पूर (Flood) आला आहे.

दरम्यान, दुसरीकडे पाऊस नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुर्ण जुन महिना गेला.
जुलै अर्धा लोटला तरी पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं मराठवाड्यात तब्बल 44 टक्के पेरण्या बाकी आहेत.
तर ज्या शेतकऱ्यांनी (Farmer) पेरण्या केल्या त्या देखील पावसाअभावी हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title :  Maharashtra Rain Update | yellow alert for rain in maharashtra today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा