Maharashtra Rains | राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय ! पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा एकदा पाऊस (Maharashtra Rains) सक्रिय झाला आहे. पुढील चार ते पास दिवस पुन्हा राज्यातील विविध भागात पावसाची (Maharashtra Rains) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार (Heavy Rainfall) पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरण बदल (Climate change) असल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

यंदाच्या मोसमात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीमध्ये किंवा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीहून 12 टक्के पाऊस अधिक आहे. यामध्ये मराठवाड्यात 32 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस (Maharashtra Rains) झाला आहे.

दरम्यान, पुढच्या 12 तासात हे क्षेत्र अजून तीव्र होण्याची आणि पुढील 48 तासांत ओडीशाच्या किनारपट्टीकडे (Odisha coast) सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. तर काही ठिकाणी हाच पावसाचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदाच्यावर्षी झालेल्या पावसामध्ये कोकण विभागातील (Konkan region) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.
तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, मराठवाडा, औरंगाबाद, बीड, परभणी याठिकाणी अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.
याउलट विदर्भात मात्र एकाही जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झालेला नाही. आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Titel :- Maharashtra Rains | heavy rain fall in maharashtra for upcoming 4 days says imd know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘डबल डेकर’ उड्डाणपूल उभारण्याचा विचार करावा – नितीन गडकरी (UNCUT (व्हिडीओ)

 Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शस्त्रक्रियेद्वारे गुघड्याखालील कापलेला पाय टाकला कचरा पेटीत, डॉक्टरासह आयावर गुन्हा दाखल