Maharashtra Rains | महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस? उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात हवामान (Maharashtra Weather ) स्वच्छ होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्यापही थंडी (Cold) जाणवत आहे. मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी सौम्य थंडी जाणवत आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) थंडी आणि धुक्याचा (Fog) प्रकोप आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहण्याचे हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे. यानंतर 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे. पुढील काही दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मागील अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरु आहे. तर पावसानंतर (Maharashtra Rains) हवेचे प्रदूषण सुधारेल.

 

राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामानाचा अंदाज
मुंबई (Mumbai) –
आज मुंबईत कमाल तापमान (Maximum Temperature) 33 तर किमान तापमान (Minimum Temperature)18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक (Air Quality Index) ‘मध्यम’ श्रेणीत 188 नोंदवला गेला आहे.

पुणे (Pune) – पुण्यात कमाल तापमान 28 तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 156 नोंदवला गेला आहे.

नाशिक (Nashik) – नाशिकमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
याठिकाणी देखील हवामान स्वच्छ राहील. मध्यम श्रेणीतील हेवेचा दर्जा 131 आहे. (Maharashtra Rains)

नागपूर (Nagpur) – याठिकाणी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 120 नोंदवला गेला आहे.

औरंगाबाद (Aurangabad) – आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान निरभ्र राहील.
हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीत 115 आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | maharashtra weather report today weather report of maharashtra mumbai pune nagpur nasik aurangabad 30 january cold and rain

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा