Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनामुळे 24 तासांत 123 जणांचा मृत्यू, आतापर्यंत मृतांचा आकडा 2710 वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. गुरुवारी सायंकाळी राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले कि, महाराष्ट्रात कोरोना 24 तासांत कोरोनामुळे 123 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोना संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही सर्वात मोठी आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 2710 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 24 तासात राज्यात 2933 नवीन घटनांची नोंद झाली आहे. यानंतर, महाराष्ट्रात एकूण कोरोना प्रकरणांची संख्या वाढून 77,793 झाली आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना बाधित राज्य आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश हे कोरोनामुळे त्रस्त आहेत. आज उत्तर प्रदेशात कोरोना पॉझिटिव्हचे 371 नवीन रुग्ण आढळले तर 15 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 9237 झाली आहे आणि मृतांचा आकडा 245 वर पोहोचला आहे. आज कर्नाटकात कोविड 19 ची 257 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आणि 4 मृत्यूंची नोंद आहे. यासह राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4,320 झाली आहे आणि तर मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. तामिळनाडुमध्ये आज कोरोनाचे 1,373 नवीन रुग्ण आढळले असून 12 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर राज्यात एकूण प्रकरणांची संख्या 27,256 झाली आहे तर मृत्यूची संख्या वाढून 220वर पोहोचली आहे.

देशात आणि जगात कोरोना विषाणूचा धोका सतत वाढत आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. 15 दिवसांत कोरोना विषाणूची एक लाखाहून अधिक प्रकरणे वाढली आहेत. गेल्या 24 तासांत 9,304 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत तर 260 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात नव्या प्रकरणांचा हा विक्रमी आकडा आहे. देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 2,16,919 झाली आहे तर आतापर्यंत विषाणूमुळे 6075 लोक मरण पावले आहेत. गुरुवारी, देशात कोरोना विषाणूची सक्रिय संख्या 1,06,737 आहे, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 1,04,107 झाली आहे. जगात या विषाणूचा संक्रमित आकडा 65.5 लाखांवर गेला आहे. त्याचवेळी मृत्यू झालेल्या लोकांची संख्या चार लाखांच्या जवळपास आहे.