हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका, म्हणाले – ‘त्याचं 2 स्वभाव, साधाभोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा’

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, अशी टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (rural-development-minister-hasan-mushrif) यांनी पाटील यांच्यावर टीका केली.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधतांना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिला. ते लोकांना मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा स्वभाव आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढण्याचा, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

आमदाराच नाही तर पोटनिवडणूक कशी होणार?
पोटनिवडणुका लावा. कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, असे आव्हान पाटील यांनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. कोल्हापुरातील दहा आमदारांपैकी दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत. चार काँग्रेसचे आहेत. काही शिवसेनेचे आहेत आणि तीन अपक्ष आमदार आहेत. त्यांच्यासाठी कोण राजीनामा देईल. भाजपचा एकही आमदार नसल्याने पोटनिवडणुका कशा होतील? असे सवाल करतानाच जी गोष्ट होणारच नाही, त्यावर चंद्रकांतदादा कशासाठी बोलत आहेत?, असा खोचक सवालही त्यांनी केला.

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावे बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. माझं आणि देवेंद्रजींचं बोलणे झालेले आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचे ठरलेले असल्याचे पाटलांनी सांगितले असं मुश्रीफ म्हणाले होते. दरम्यान, पाटील यांनी मुश्रीफ यांचा हा दावा फेटाळून लावला होता. हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहेत. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणाले.