एकनाथ खडसें ऐवजी त्यांच्या मुलीला तिकीट ?

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीसाठी काल भाजपने आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अनेक दिग्गज आमदार आणि मंत्र्यांची यामध्ये नावे नसून  भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे देखील यामध्ये नाव नाही. त्यामुळे खडसे यांचा पत्ता कट केला कि असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

मात्र एकनाथ खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी काल मुक्ताईनगर या आपल्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र भाजपने त्यांना पहिल्या यादीत उमेदवारी न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी खडसे यांच्या घरासमोर आंदोलन केले. यादीत नाव नसले तरी खडसे यांनी वाट न पाहता आपला उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मात्र यासंदर्भात खडसे यांनी देखील आपले पत्ते उघड केले नसून भाजपचे नेते खडसे यांना उमेदवारी देण्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यास अनुकूल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपने काल उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आता विविध नेत्यांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली असून भाजप या सर्व बंडोबांना कशाप्रकारे शांत करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com