संजय राऊतांचा भाजपावर ‘घणाघात’, म्हणाले – ‘NDA वर कुणाचा मालकी हक्क नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने संकेत दिले की त्याने एनडीएशी फारकत घेतली आहे. आता शिवसेना एनडीएनच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. याच मुद्यावरुन संजय राऊत यांनी एनडीएच्या बैठकीवरुन भाजपवर हल्लाबोल केला. भाजप जर सर्वात मोठा आहे तर मग राज्यपालांनी बोलावले होते. तेव्हा सरकार स्थापन का केले नाही? भाजपला राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार करायचा आहे, असा आरोपही राऊतांनी भाजपवर लावला.

संसदीय हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएकडून घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. परंतू या बैठकीला उपस्थित राहण्यास शिवसेनेकडून नकार देण्यात आला आहे. संजय राऊतांनी शिवसेनेची ही भूमिका मांडली आहे.

यासह राऊतांनी खुलासा केला की एनडीएची बैठक ही काही पक्षप्रमुखांची नव्हती. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याआधी 48 तासाआधी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होत असते. सध्या राज्यात राजकीय परिस्थितीत पाहात बरीच धावपळ सुरु झाली आहे. त्याआधीही अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर एनडीएच्या या बैठकीबद्दल शिवसेनेला निमंत्रण मिळालं नाही. पण, पत्र मिळाले नसले तरी हरकत नाही. याआधीच आमचा बैठकीला न जाण्याचा निर्णय झाला होता.

संजय राऊतांनी यावेळी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला, ते म्हणाले की 2014 साली देखील अशाच प्रकारे एनडीएतून बाहेर पडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात सेनेने भाजपबरोबर युती तोडली परंतू एनडीएवर कोणाचाही मालकी हक्क नाही, कोणाचीही जाहागीर नाही.

अकाली दल, शिवसेना एनडीएचे घटक संस्थापक आहेत. जर कोणाच्या मनात असेल की आम्ही कुणाला पत्रं दिलं नाही तर तो भ्रम चुकीचा आहे. एनडीए जेव्हा स्थापन झाली तेव्हा आताचे नेते नव्हते. एनडीएमध्ये मालकशाही चालणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि न्यायहक्कासाठी एनडीएपासून दूर होत आहोत. उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करणायात आला म्हणून आम्ही एनडीएतून बाहेर पडत आहोत असे ही राऊतांनी सांगितले.

त्यांना राष्ट्रपती राजवटीचा फायदा घ्याचाय –
राऊतांनी भाजपवर टीका करत सवाल केला आहे. 105 त्यांच्याकडे आकडा आहे. गृहित धरुन चालूया 119 असेलही. जर भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. जेव्हा राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले होते. तेव्हा भाजपने असमर्थता दर्शवली. त्यानंतर जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यानंतर भाजप नेत्यांचे सूर बदलले. राष्ट्रपती राजवटीचा फायदा घेऊन घोडेबाजार करुन सरकार स्थापन करण्याचा भाजप नेत्यांचा हेतू आहे. मग आधीच का दावा केला नाही. राजभवनातून भाजपला वेगळे 40-50 आमदार दिले आहे का ?

महाशिवआघाडीचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला आहे. यात पदांच्या वाटपावर अजून चर्चा झाली नाही. परंतू मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार ही गोड बातमी लवकरच मिळणार असा विश्वास देखील संजय राऊतांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like