महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मध्यवर्ती संघटना देशव्यापी संपात सहभागी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशातील केंद्र व राज्य शासनाने कामगार विरोधी धोरण व प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवर 11 केंद्रीय कामगार संघटनेने आज पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये
महाराष्ट्र राज्यातील हिवताप व हत्तीरोग विभागाची एकमेव शासन मान्य महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मध्यवर्ती संघटना विविध मागण्यांसाठी आज संपात सहभागी होऊन राज्यातील सर्व जिल्ह्या मध्ये प्रखरपणे आंदोलन केले.

Laboratory
संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रविण चकूले यांनी दि 4 जानेवारी रोजी देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आव्हाहन केले होते आणी आज संपूर्ण राज्यभर संघटनेच्या मागण्यांसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी हे कार्यालया समोर व विविध महत्वाच्या रस्त्यावरून रॅली मध्ये सहभागी होऊन एकच मिशन जुनी पेन्शन या उद्घोषणा व नारेबाजी ची करीत मार्गक्रमण करतांना दिसत होते . या सोबतच संघटनेच्या प्रमुख मागण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा यासाठी संपात सहभागी झाले.
Laboratory
प्रमुख मागण्या –
*
अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी.
* शासन यंत्रणेतील लाखो रिक्त पदे त्वरित भरावे.
* बक्षी समितीने शासनास सादर केलेला खंड 2 त्वरित विनाविलंब प्रसिद्ध करावा.
* शासन परिपत्रक क्र/ संकीर्ण2019/प्र. क्र.287/सेवा-5 दि 22/11//2019 चे परिपत्रक तत्काळ रद्द करून विभागाचे जिल्हा परिषदेत हस्तांतरण रोखवे.
* केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांना जोखीम भत्ता मिळावा
* समान काम समान वेतन देण्यात यावे.
* प्र वै अधिकारी संवर्गातील आरोग्य विभाग व सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी मान्य केलेली पदश्रुंखला विनाविलंब आकृतिबंध मध्ये लागू करावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/