Maharashtra Temperature | वायव्य भारतात थंडीची लाट ! पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात होणार मोठी घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन हिवाळ्याच्या (Winter) दिवसात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने थंडी (Cold) गायब झाली होती. मात्र, आता हवामानात (Maharashtra Temperature) बदल होत असून मागील दोन आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सर्वत्र कोरड्या हवामानाची (Maharashtra Temperature) नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्याचे दोन आठवडे झाले तरी अद्याप अपेक्षित थंडी पडलेली नाही. परंतु आता पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबसह वायव्य भारतात (Northwest India) थंडीची लाट (Cold wave) आली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत वायव्य भारतात थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हवामान खात्याने (IMD) इशारा जारी केला आहे.
मागील काही दिवसांपासून देशातून थंडी गायब झाल्यानंतर, पंजाबसह (Punjab) मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि बहुतांश गुजरातमध्ये (Gujarat) पुन्हा थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसात या ठिकाणी किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस घट होणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra Temperature) जाणवणार आहे. या काळात महाराष्ट्रात देखील 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची घट होण्याची शक्यता आहे.
येत्या 4-5 दिवसांत वायव्य व लगतच्या मध्य भारत व गुजरात राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात 2-4° घसरण व काही ठिकाणी थंडीची/तीव्र थंडीची लाट शक्यता.
पुढील 4 दिवसांत पूर्व भारत – महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत 2-3° ने घसरण.
– IMD pic.twitter.com/3t8hsnV1mL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 16, 2021
दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) तापमानाचा पारा 12 अंशावर पोहचला असून विर्भात थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे विदर्भकरांना गुलाबी थंडीची अनुभुती येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. मागील दोन आठवड्यात कोरड्या हवामानाची नोंद झाल्यानंतर विदर्भात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे जम्मू काश्मिर (Jammu and Kashmir) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan)
आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसांत जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान,
मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हिमवर्षावासह (Snowfall) पावसाची शक्यता आहे.
तर उद्या उत्तर पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रासह मध्य भारतात तापमानाचा पारा घसरला आहे.
Web Title :- Maharashtra Temperature | latest weather updates cold wave in india temperature in maharashtra imd report
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Saif Ali khan | पहिल्या भेटीतच अमृताकडून सैफ अली खाननं मागितले 100 रूपये उधार, जाणून घ्या किस्सा…