Maharashtra Temperature | दिलासादायक ! राज्यातील तापमानात किंचित घट होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Temperature | गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाख्याने जीव व्याकुळ झाला आहे. विदर्भात (Vidarbha) सर्वाधिक उन्हाची तीव्रता जाणवत असून राज्यात उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे शाळांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. मात्र आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या 24 तासानंतर उत्तर-दक्षिणेकडील राज्यांतील तापमानात काही प्रमाणात घट होणार आहे. महाराष्ट्रातील तापमानही (Maharashtra Temperature) घटेल अशी शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. दरम्यान, पुढील चार-पाच दिवस काही भागामध्ये तापमान सरासरीच्या पुढेच राहणार आहे तर कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) आणखी दोन दिवस पावसाळी (Rain) वातावरण राहणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

गेल्या 15 दिवसापासून उत्तरेकडील उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) उष्णतेची अतितीव्र तर हिमाचल प्रदेशापासून (Himachal Pradesh) दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) ते मध्य प्रदेशपर्यंत (Madhya Pradesh) उष्णतेची लाट कायम आहे. असे असले तरी या भागात कमाल तापमानात 12 एप्रिलपासून 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. परंतु मध्य प्रदेशमधील काही भागात उष्णतेची लाट कायम राहील. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपुढे राहील. उर्वरित महाराष्ट्रात मात्र दोन दिवस तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Temperature)

हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सोमवारी विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी 43.7 अंश कमाल तापमानाची नोंद केली. तर बुलढाणा वगळता इतरत्र तापमान अद्यापही 40 अंशांपुढे आहे.
मराठवाडय़ात तर सर्वच ठिकाणी 40 अंशांपुढे कमाल तापमान आहे.
दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक,
सोलापूरमध्ये कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली असून, ते 40 अंशांखाली आले आहे.
तर कोकणासह मुंबईत कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Web Title :  Maharashtra Temperature | slight decrease temperature state possible rainy conditions konkan central maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून