पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे 2 हजार 820 मतांनी विजय झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या योगेश टिळेकरांचा पराभव केला आहे. चेतन तुपे यांना तब्बल 92 हजार 326 मते पडली तर योगेश टिळेकरांना 89 हजार 506 मते पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांना 34 हजार 809 मते पडली आहेत. 351 मतदारांनी पोस्टल मतदान केलं होते. दरम्यान, 2474 मतदारांनी नोटाचा वापर केला.
हडपसर मतदार संघ
1. चेतन विठ्ठल तुपे (राष्ट्रवादी) – 92326 मते – विजयी झालेले उमेदवार
2. दिपक महादेव जाधव (बहुजन समाज पार्टी) – 1223 मते
3. योगेश कुंडलिक टिळेकर (भाजप) – 89506 मते
4. वसंत कृष्णा मोरे (मनसे) – 34809 मते
5. कृपाल कृष्णराव पलुसकर (प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी) – 698 मते
6. घनशाम आनंद हाके (वंचित) – 7570 मते
7. जिहाद इब्राहिम शेख (एमआयएम)- 7901 मते
8. अंजुम झकेरिया इनामदार (अपक्ष) – 367 मते
9. अनुप जालिंदर शिंदे (अपक्ष) – 164 मते
10. अर्जुन लक्ष्मण सिरसाठ (अपक्ष) – 230 मते
11. अॅड. मोहम्मद जमिर शेख (अपक्ष) – 228 मते
12. अॅड. तोसिफ शेख (अपक्ष) – 164 मते
13. रेखा हाकरू वाल्मिकी (अपक्ष) – 256 मते
14. सुभाष काशिनाथ सरवदे (अपक्ष) – 253 मते
15. नोटा – 2474
टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.