UP चे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्यावर बनणार सिनेमा ! शेअर केला फर्स्ट लुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम :  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राजकारणातील एक मजबूत नेते मुलायम सिंह यादव यांच्यावर लवकरच सिनेमा बनणार आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक नेत्यांवर सिनेमे आले आहेत. आता बॉलिवूडची नजर सपाचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्यावर पडली आहे. लवकरच आता त्यांच्यावर आधारीत सिनेमा येत आहे.

मुलायम सिंह यावद यांच्यावर बनणार सिनेमा
मुलायम सिंह यादव यांच्यावर बनणाऱ्या सिनेमाचं नाव मैं मुलायम सिंह यादव ठेवण्यात आलं आहे. या सिनेमाचं डायरेक्शन सुवेंदु राज घोष करणार आहेत. खास बात अशी की, सिनेमाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. यात मुलायम सिंह खूप सशक्त रूपात दाखवण्यात आले आहेत.

शेअर केला फर्स्ट लुक
सिनेमाचं पोस्टर शेअर करताना सांगितलं आहे की, “मुलायम सिंह यादव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी राजकारणात तेव्हा पाऊल टाकलं जेव्हा भांडवलशाही आणि नोकरशाहीचा बोलबाला होता.” सिनेमाचा फर्स्ट लुक सध्या सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहे.

सिनेमातील कास्टींग
सिनेमातील कास्टींगबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात मित सेठी, मिमोह चक्रवर्ती, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, जरीना वहाब, सुप्रिया कर्णिक असे अनेक कलाकार आहेत. सिनेमाची रिलीज डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही. क्रिटीक कोमल नहाटानं या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

मुलायम सिंहांविषयी थोडक्यात…
मुलायम सिंह यादव यांनी 1960 मध्ये सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं होतं. ते 3 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्र्यांसारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.