पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील वीरपत्नी नितिका विभूती धौंडियाल बनल्या ‘लेफ्टनंट’

उधमपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या पत्नी नितिका धौंडियाल (Nikita Dhoundiyal) या लष्करात लेफ्टनंट बनल्या आहेत. नितिका यांना आज एका समारंभात भारतीय सैन्य दलाचा गणवेश देण्यात आला. त्यांच्या खांद्यावर फित लावून त्यांचा लष्करात समावेश करुन घेण्यात आला आहे.

सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

पुलवामा येथे १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे जैश ए मोहम्मद च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मेजर विभूती शंकर धौंडियाल हे शहीद झाले होते. त्यांच्या पत्नी नितिका Nikita Dhoundiyal यांनी विभूतीचे कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी सैन्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

या घटनेनंतर त्यांनी एक वर्षांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनची लेखी परीक्षा व मुलाखत दिली. त्यात त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील ऑफिसरर्स कॅम्पमध्ये एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आज त्यांचा लष्करात समावेश करण्यात आला आहे.

WhatsApp वर तीन रेड टिकचा काय आहे अर्थ? सरकार तुमच्यावर ठेवणार का लक्ष?, जाणून घ्या

नितिका Nikita Dhoundiyal यांचे कुटुंबीय मुळचे काश्मीरचे आहे. या घटनेच्या सुमारे ८ वर्षांपूर्वी त्यांचा विभूतीबरोबर विवाह झाला होता. त्या दिल्लीत एमएनसीमध्ये काम करीत होत्या. पुलवामा घटनेने त्यांच्यावर मोठा आघात केला. त्यातून सावरत त्यांनी विभूतीचे कार्य पुढे नेण्यासाठी लष्करी गणवेश परिधान करण्याचा निर्धार करुन नोकरी सोडली. अतिशय खडतर परिक्षा व प्रशिक्षण पूर्ण करुन त्या लष्करात लेफ्टनंट बनल्या आहेत.

READ ALSO THIS

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

सांगली पोलिसांची मोठी कारवाई ! दरोडा टाकणार्‍या टोळीतील 6 जणांना अटक

‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षकासह 5 पोलिस तडकाफडकी निलंबीत

Pune : पुण्यातील मार्केटयार्डामधील पार्किंग शुल्क अन् भाडे आकारणीला स्थगिती