वाराणसीत पत्नीचं निधन, मुंबईत अडकलेल्या पतीच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनूनं स्वत:च्या खर्चानं आजवर हजारो कामगारांना घरी सुखरूप पोहोचवलं आहे. मुख्यमंत्र्यांपासून तर राज्यपालापर्यंत सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. अलीकडेच अशी घटना समोर आली की, एका व्यक्तीच्या पत्नीचं वाराणसीत निधन झालेलं आणि तो मुंबईत अडकला होता. सोनूनं त्यालाही मदत केली आहे.

एकानं व्यक्तीनं पोस्ट शेअर करत लिहिलं की, “माझ्या शेजारी राहणारे सीताराम यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. त्यांना अंत्यसंस्कारासाठी वाराणसीला जायचं आहे. ते एकूण तीन लोक आहेत. कृपया मदत करा. आमच्याकडे तुमच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाहीये.” सोनूनं या ट्विटला उत्तर दिलं की, “आम्हाला ऐकून खूप वाईट वाटलं. आम्ही उद्याच त्यांना पाठवण्याची सोय करतो. लवकरच ते घरी पोहोचतील.”

सोनू स्थलांरीत मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर किंवा कॉलवर त्यांच्या घरी सोडत आहे. सोनू सूदनं मजुरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही प्रसिद्ध केला आहे.