‘अनाथ’ पोपटाच्या पिल्लाचं ‘संगोपन’ करून अशा प्रकारे वाढवलं, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आईपेक्षा मोठे या जगात काहीच नाही. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण आई नसेल तर मुलाची काळजी कोण घेईल. मात्र एका व्यक्तीने असेच मातृत्व दाखवले आहे, ज्याच्यामुळे एका पोपटाचा जीव वाचला. आज त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एखाद्या दुसऱ्या पाळीव प्राण्याचे संगोपन करणे सोपे आहे, पण पोपटाच्या पिल्लाला अंड्यातून काढून खायला घालून निरोगी पक्षी बनवणे सोपे नाही. कारण हे खूप अवघड काम आहे. अगदी छोट्या गोंधळामुळेही पोपटाच्या पिल्लाचा जीव जाऊ शकत होता.

या व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहे की, त्या व्यक्तीने अंड्यातून पोपटाचे पिल्लू कसे काढले आणि त्याला कसे वाढवले. वास्तविक या पिल्लाची आई मरण पावली होती. ज्यानंतर व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीने त्याचे संगोपन केले.

हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी व्हायरल केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ६ ऑगस्ट रोजी म्हणजेच गुरुवारी पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडिओ आतापर्यंत २७ हजार वेळा लाईक केला गेला आहे. ८ हजार वेळा रिट्विट केला गेला आहे. ५७३ हून अधिक कमेंट आल्या आहेत.

या व्हिडिओसह परवीन कासवान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सर्वात सुंदर गोष्ट पहायला मिळते! पोपटाची आई मरण पावली, म्हणून त्याने पिल्लाला वाढवले. सुंदर आहे ना!

व्हिडिओत दाखवले गेले आहे की, पोपटाच्या पिल्लाला त्या व्यक्तीने अंड्यातून कसे बाहेर काढले. त्यानंतर त्याने एका आईसारखे त्याला वाढवले.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने पिल्लाला उडणारा पोपट बनवण्यासाठी किती बारकाईने आणि कठीण काम केले आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्यक्तीचे खूप कौतुक केले आहे.