काय सांगता ! होय, ‘तिखट’ मोमोज खाल्ल्यानं पोटात झाला ‘स्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  चीनमध्ये मोठ्या प्रमाणात मोमोज हा पदार्थ खाल्ला जातो. मात्र, चीनच्या जिआंग्सु प्रांतात मोमोज खाल्याने एका व्यक्तीच्या पोटात स्फोट झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने जेवणामध्ये खूप मिर्ची असलेले मोमोज खाल्ले. नंतर त्याच्या पोटात दुखू लागले. पुढे जात त्याच्या पोटातून आवाजही येऊ लागला. आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सदरील व्यक्तीस आधीपासून पोटाचे विकार होते.
त्याला मसालेदार पदार्थ खाण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. पण ६३ वर्षीय वांग यांनी डॉक्टरांचा सल्ला जुमानून मिर्ची असलेले मोमोज खाल्ले. वांग यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या आतड्यांमध्ये स्फोट झाल्याचे समजते. या प्रकारांनंतर डॉक्टर सुद्धा खूप घाबरुन गेले होते.

याबाबत बोलताना वांग म्हणाले, तिखट मिर्चीचे मोमोज खाल्ल्यामुळे त्यांना पोटा मध्ये स्फोट झाल्याचा भास झाला. त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं की, वांग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा त्याच्या पोटात तीव्र स्वरुपाच्या वेदना जाणवत होत्या. मात्र, जेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा पोटाची स्थिती पाहून सर्व जणांना धक्काच बसला.

थोडक्यात बचावला जीव

एका स्थानिक वृत्तपत्राला डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीस पूर्वीपासून पोटाचे विकार होते. त्यांना आतड्याचा त्रास सुद्धा होता. या आजारपणात अन्न आतड्यात अडकते, त्यानंतर पोटात त्यात होणार गॅस बाहेर पडू शकत नाही. दरम्यान, या व्यक्तीने मसालेदार मोमोज खाल्यावर तिखट सूपही पिले होते. म्हणून त्यांच्या पोटामध्ये लगेच गॅस निर्माण झाला. मात्र, अन्न आतड्यांमध्ये अडकल्याने गॅस बाहेर जाऊ शकला नाही आणि पोटात स्फोट झाला. खूप प्रयत्न केल्यानंतर वांग यांना वाचवण्यात यश आल्याचं, डॉक्टरांनी म्हटलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like