‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर मासे विकण्याची आली वेळ ?, जाणून घ्या ‘या’ मागचं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या डान्सने चाहत्यांना वेडे केले आहे. ती सोशल मीडियावर बऱ्याचदा आपला डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. पण सध्या ती वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मानसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मासे विकताना दिसत आहे. तिचा फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, मानसीने मासे विकायला सुरुवात केली की काय?

https://www.instagram.com/p/B6zhI4ogjjP/

मानसीने मासोळी बाजारात मासे विकतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने हातात सुरमई पकडली आहे. त्याचबरोबर नेहमी आपल्या सुंदर मेकअपने चाहत्यांना घायाळ करणारी मानसी फोटोत खूप साध्या लुकमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करुन मानसीने लिहले आहे की, ‘सनडे मार्केटला माझ्या मासोळीचा भाव रापचिक होणार आहे.’

https://www.instagram.com/p/By4D20AApvB/

मानसी मासे विकत असतानाचा फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहे. मात्र चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण हा फोटो एका नव्या आल्बमसाठी आहे. तिचा नवीन व्हिडिओ येणार आहे. ज्याची निर्मिती म्युझिकने केली आहे. हे गाणे कोळीगीत असून हा अल्बम 12 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. मानसीच्या या फोटोला हजारो चाहत्यांचे लाइक आणि कमेंट येत आहे. मानसीबद्दल बोलायचे म्हणले तर ती उत्तम डान्सर असून हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून ती आपल्या डान्सचे जलवे दाखवते.

https://www.instagram.com/p/BsId4D4hCkG/

याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. तिने आत्तापर्यंत ‘एकता – एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याप्रमाणेच ‘बाई वाडयावर या’हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले आहे.

https://www.instagram.com/p/Br1mEn5hG2D/

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/