Maratha Reservation | मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, चंद्रकात पाटील आज जालन्यात येणार, जरांगे यांच्या भेटीसाठी हालचाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्याचे मान्य केले असले तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपोषणस्थळी चर्चेसाठी आल्याशिवाय उपोषण स्थगित करणार नाही, अशा पाच अटी समोर ठेवल्या आहेत. (Maratha Reservation)

त्यानुसार, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सायंकाळी जालन्यात जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जालन्यात जाणार अथवा नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Maratha Reservation)

स्वता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन मोठे मंत्री जालन्यात गेल्यानंतर मनोज जरांगे उपोषण स्थगित
करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज आज १५वा दिवस आहे. (Maratha Reservation)

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील आज सायंकाळी ५ वाजता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी गावात जाऊन जरांगे पाटील यांच्याशी उपोषण मागे घेण्यासाठी चर्चा करणार आहेत.

शिंदे, पवार आणि पाटील हे भेटीसाठी येणार असल्याबाबत जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, मला अधिकृत कोणाचाही फोन आला नाही. मीडियाच्या माध्यमातून मला सुद्धा समजले. पण त्यांना समाजाशी संवाद साधण्यासाठी येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे.

काल मंगळवारी रात्री उशीरा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली.
यावेळी सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा घडवून आणली.

यावेळी मंत्री संदीपान भुमरे, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे उपस्थित होते.
सरकारच्या वतीने आलेल्या या नेत्यांनी मराठा आंदोलनाचे पदाधिकारी आणि जरांगे यांच्याशी सुमारे दोन ते
अडीच तास चर्चा केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा, रात्री उशीरा मंत्री सामंतांनी घेतली भेट

13 September Rashifal : कन्या, तुळ आणि कुंभ राशीला नोकरीसाठी चांगला दिवस, वाचा दैनिक भविष्य

Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | ‘औकातीत रहायच, माझ्या बापाने आणि आम्ही…’
नवनीत राणांच्या आरोपांवर यशोमती ठाकूर भडकल्या